रत्नागिरीसावर्डेत शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात; चिपळूण तालुक्यातील ४२ संघांचा सहभाग

सावर्डेत शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात; चिपळूण तालुक्यातील ४२ संघांचा सहभाग

सावर्डेत शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात; चिपळूण तालुक्यातील ४२ संघांचा सहभाग

सावर्डे (ता. चिपळूण) : सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या सह्याद्रि क्रीडा संकुलावर शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अनिरुद्ध निकम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील सर्व गटांतील जवळपास ४२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

खेळाडूंना शुभेच्छा देताना अनिरुद्ध निकम म्हणाले, “मी सुद्धा एक खेळाडू आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ आवश्यक आहे. सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळ खेळून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे.”

ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

उद्घाटन कार्यक्रमास सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी माननीय महेश महाडिक, गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे तसेच क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा आरोग्य व शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उदयराज कळंबे आणि चिपळूण तालुका समन्वयक समीर कालेकर यांच्या नियोजनानुसार ही स्पर्धा पार पडली.

Breaking News

जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत तब्बल २२५ विद्यार्थ्यांचा सहभाग

जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत तब्बल २२५ विद्यार्थ्यांचा सहभाग रत्नागिरी :...

खादी-ग्रामोद्योगातून आत्मनिर्भर महाराष्ट्राची वाटचाल – उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत

खादी-ग्रामोद्योगातून आत्मनिर्भर महाराष्ट्राची वाटचाल!उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत---👉राष्ट्रपिता महात्मा गांधी...