रत्नागिरीसीमा भागातील मराठी भाषिकांवर सातत्याने होत असलेल्या अन्याया संदर्भात तसेच त्यांच्या विविध...

सीमा भागातील मराठी भाषिकांवर सातत्याने होत असलेल्या अन्याया संदर्भात तसेच त्यांच्या विविध न्याय मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याकरिता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याकरिता मी मा. मुख्यमंत्री महोदयांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पत्राद्वारे विनंती केली होती

सीमा भागातील मराठी भाषिकांवर सातत्याने होत असलेल्या अन्याया संदर्भात तसेच त्यांच्या विविध न्याय मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याकरिता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याकरिता मी मा. मुख्यमंत्री महोदयांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पत्राद्वारे विनंती केली होती. त्या अनुषंगाने  महाराष्ट्र विधान मंडळात मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा सुनेत्रा ताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा शरद पवार साहेब, मा चंद्रकांत दादा पाटील, मा शंभूराज देसाई, मा हसन मुश्रीफ , खासदार मा नारायणराव राणे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश मरगाळे , माजी आमदार श्री मनोहर किनयेकर, सदस्य श्री महेश बिरगे, श्री शुभम हलदे इत्यादी उपस्थित होते. सदर बैठकीस मा. ना. उदयजी सामंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली तसेच सदर प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिले.

महाराष्ट्र शासन नेहमीच सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याबाबत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सीमा भाषिक बांधवांना आश्वस्त केले.

Breaking News