रत्नागिरीसुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण निर्मित ‘रंग दे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण निर्मित ‘रंग दे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण निर्मित ‘रंग दे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : मराठी संगीतविश्वात एक नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक तथा निर्माता रुपेश चव्हाण यांनी निर्मित केलेले ‘रंग दे’ हे भव्य सांगीतिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याची निर्मिती करण्यासाठी रुपेश चव्हाण याना आदित्य सिंघानिया यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

त्यांच्या सहकार्यातून या गाण्याची निर्मिती करण्याची संधी प्राप्त झाली आहे असे रुपेश चव्हाण यांनी सांगितले.उच्च दर्जाची निर्मिती, आकर्षक चित्रीकरण आणि बॉलिवूड शैलीचा लुक यामुळे हे गाणे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या गाण्यात ‘मिस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५’ वृष्टी भान हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेता रवी भाटिया प्रमुख भूमिकेत झळकला आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री आणि मनमोहक सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
गाण्याचे दिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केले असून हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी साइराम यांच्या सुरेल आवाजाने गाण्याला विशेष रंगत प्राप्त झाली आहे. त्रिनिती ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल गीतकार मंदारचोळकर यांनी लिहिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी नियोजनामध्ये प्रोडक्शन हेड प्रकाश सदावर्ते यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
‘रंग दे’ हे गाणे प्रेम, भावना आणि आकर्षक दृश्यांनी सजलेले असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास निर्माते रुपेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मराठी संगीत क्षेत्रातील या दर्जेदार कलाकृतीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणे पोहोचवावे, असे आवाहन निर्माते रुपेश चव्हाण यांनी केले आहे.
हे गाणे पॅनोरमा म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले असून संगीतप्रेमींनी ते अवश्य पाहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Breaking News

सामान्य प्रशासन विभागाचे विभाजन माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र...