रत्नागिरीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ ऑक्टोबरला जामगे येथे माजी सैनिकांचा मेळावा

सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ ऑक्टोबरला जामगे येथे माजी सैनिकांचा मेळावा

सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ ऑक्टोबरला जामगे येथे माजी सैनिकांचा मेळावा
रत्नागिरी, (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून वीर माता-पिता, वीर नारी व माजी सैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता खेड तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथील सभागृहात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेश रामदास कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात माजी सैनिकांच्या पेन्शनविषयक तक्रारी, अभिलेख (रेकॉर्ड) कार्यालयाशी संबंधित बाबी, ‘महासैनिक’ पोर्टलवरील नोंदणी तसेच इतर विविध प्रशासकीय अडचणींचे प्रत्यक्ष निराकरण केले जाणार आहे.
मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या संबंधितांनी खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:

  • माजी सैनिक / विधवा ओळखपत्र
  • डिस्चार्ज बुक (Discharge Book)
  • पी.पी.ओ. (PPO) ची प्रत
  • आधार कार्ड व पॅन कार्ड
  • बँक पासबुक व ई.सी.एच.एस. (ECHS) कार्ड
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन
    तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता व वीर पित्यांनी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे (ता. खेड) येथे वेळेत उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

Breaking News

जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आदेश

जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत...