सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद–
रत्नागिरी दि. २१ :- रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
