रत्नागिरीस्वातंत्र्यदिनानिमित्त खेळाडूंचा उत्साह आणि शिक्षणाचा नवा अध्याय.

स्वातंत्र्यदिनानिमित्त खेळाडूंचा उत्साह आणि शिक्षणाचा नवा अध्याय.

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे तारक मयेकर मित्रमंडळ आयोजित एकदिवशीय तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२५ ला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी देशातील पहिले ४ कोटी रुपयांचे स्वतंत्र कबड्डी स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची घोषणा करून खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक बळकट केला.

त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते वि.रा.प.कोतवडे, इंग्लिश स्कूल, कोतवडे येथील लायब्ररीचे फीत कापून उद्घाटन केले.
या लायब्ररीत ५,५०० पुस्तकांचा खजिना असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीचा हा नवा दीपस्तंभ ठरणार आहे.

त्यासमयी सरपंच संतोष बरघोडे, उपसरपंच पिंट्या पड्याल, संस्था संचालक नरेश कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, तालुका प्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, युवा तालुका प्रमुख तुषार साळवी यांसह तारक मयेकर मित्रमंडळ आणि कब्बडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...