रत्नागिरी‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील   इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने ‘हरित प्रशासन’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल टाकले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रत्यक्ष चार्जिंग करून या सुविधेची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणपूरक विकासाची गरज अधोरेखित केली. वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध स्तरांवर हरित ऊर्जा आणि स्वच्छ पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सुविधा अधिकाधिक उभारल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या चार्जिंग स्टेशनमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगची सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला चालना मिळणार असून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

Breaking News

Що казино вважають бонусним зловживанням

Що казино вважають бонусним зловживаннямНа підлозі казино це видно...

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην Πράξη

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην...