रत्नागिरी, दि.29 (जिमाका) : शासकीय कार्यालयासाठी १०० दिवसाच्या कृती आराखडा एकूण ७ मुद्यावर जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी या तीन कार्यालयाला भेट देऊन भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबईचे उपसंचालक अनिल माने यांनी तपासणी व मूल्यांकन केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील भूमापन नकाशाचे स्कॅनिंग व डिजीटायझेशन ई रेकॉर्ड बल्क साईन, परिरक्षण भूमापक, आणि लिपिक यांची दप्तर तपासणी केली. तसेच स्कॅनिंग व डिजीटायझेशन ई रेकॉर्ड बल्क साईन करून काम सुलभरित्या पूर्ण करण्याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिनस्त तालुक्यातील १०० दिवसाच्या कृती आराखडा कामाचा आढावा घेतला.
मौजे – केळ्ये येथील स.नं. १९० क्षेत्र ०.७८.८ गांवठाणमध्ये स्वामित्व योजने अंतर्गत ७६ मिळकती करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही मिळकतींची पाहणी श्री. माने यांनी केली. यावेळी त्यांनी लाभधारकांशी संवादही साधला. रोवरच्या सहाय्याने मोजणी केलेल्या वाडाजुवे आणि रत्नागिरी शहर येथील मोजणी कामाची तपासणी केली.
१०० दिवस कृती आराखडाजिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन कार्यालयाची उपसंचालकांकडून तपासणी
