रत्नागिरी८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त BSNL ची मोठी भेट; नवीन ग्राहक-केंद्रित डिजिटल उपक्रम आणि...

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त BSNL ची मोठी भेट; नवीन ग्राहक-केंद्रित डिजिटल उपक्रम आणि आकर्षक ऑफर्स

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त BSNL ची मोठी भेट; नवीन ग्राहक-केंद्रित डिजिटल उपक्रम आणि आकर्षक ऑफर्स


रत्नागिरी, (जिमाका): भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी प्रगत डिजिटल उपक्रम, नेटवर्क विस्तार आणि विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे.
कंपनीने देशभरात २६,३०० हून अधिक अतिरिक्त ४G बीटीएस साइट्स तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ग्रामीण, शहरी आणि अत्यंत दुर्गम भागांत ४G नेटवर्कचा विस्तार होईल. हे संपूर्ण तंत्रज्ञान स्वदेशी असून, भविष्यात ५G साठीही सक्षम आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर्स आणि डिजिटल सेवा
१. ₹१ ची ‘फ्रीडम २.०’ ऑफर (Freedom 2.0 Offer), नवीन ग्राहकांना BSNL मोबाईल नेटवर्कचा उत्तम अनुभव घेता यावा, यासाठी केवळ ₹१ मध्ये विशेष ऑफर लाँच करण्यात आली आहे. वैधता: २४ दिवस, डेटा: १ GB प्रति दिन, कॉलिंग: अमर्यादित व्हॉईस कॉल्स, SMS: १०० SMS प्रति दिन
२. फायबर फ्रीडम प्लॅन — ₹१,१११ प्रति महिना, ब्रॉडबँड ग्राहकांसाठी BSNL ने ‘फ्रीडम प्लॅन’ सादर केला आहे. इंटरनेट स्पीड: २०० Mbps पर्यंत, मासिक डेटा: ५,००० GB, मनोरंजन: २५ पेक्षा जास्त प्रीमियम OTT प्लॅटफॉर्म्सचे मोफत सदस्यत्व
३. ₹२,३९९ च्या प्लॅनवर ४७ दिवसांची अतिरिक्त वैधता (Extra Validity) स्वातंत्र्यदिनानिमित्त BSNL च्या ₹२,३९९ च्या वार्षिक प्रीपेड प्लॅनवर मर्यादित कालावधीसाठी अतिरिक्त ४७ दिवसांची वैधता (३६५ + ४७ = ४१२ दिवस) दिली जात आहे.
४. ५०० थेट टीव्ही चॅनेल्स मोफत (BSNL फ्री एंटरटेनमेंट टीव्ही) Tango TV च्या सहकार्याने BSNL मोबाईल ग्राहकांना आता नवीन BSNL Selfcare ॲपद्वारे जवळपास ५०० थेट (Live) टीव्ही चॅनेल्स पूर्णपणे मोफत पाहता येणार आहेत.
नवीन ‘BSNL Selfcare New’ मोबाईल ॲप लाँच-ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी ॲड्रॉईड आणि iOS प्लॅटफॉर्मवर नवीन ॲप लाँच करण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रीपेड रिचार्ज आणि पोस्टपेड/लँडलाईन बिल पेमेंट, तक्रार नोंदणी व स्टेटस ट्रॅकिंग, DND व्यवस्थापन आणि पेमेंट हिस्ट्री, फायबर बुकिंग रिक्वेस्ट, AI चॅटबॉट सपोर्ट आणि व्हॉईस सर्च, एकाधिक खात्यांचे (Multiple Accounts) व्यवस्थापन व BSNL एंटरटेनमेंट टीव्हीचा ॲक्सेस या सुविधा मिळतील.
BSNL सॅटेलाइट फोन सेवा (GSPS): ज्या ठिकाणी पारंपारिक मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते, अशा अत्यंत दुर्गम आणि कठीण भागात सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे ‘ग्लोबल सॅटेलाइट फोन सर्व्हिस’ (GSPS) प्रदान केली जात आहे.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी BSNL ने पॉलीकॅब (Polycab) सोबत भागीदारी केली आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसच्या (EMS) माध्यमातून कॅमेरे, ONT, आणि राऊटर्स यांसारखी दूरसंचार उपकरणे भारतात तयार केली जातील. यामध्ये हार्डवेअर-ॲज-अ-सर्व्हिस (HaaS) मॉडेल वापरले जाईल.
देशभरात परवडणाऱ्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल सेवा पुरवण्यासाठी BSNL कटिबद्ध आहे.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...