रत्नागिरीआज पहाटे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट तालुका. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी...

आज पहाटे कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट तालुका. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी येथे खाजगी ट्रॅव्हल क्र. MP 13 P 1371 बस रत्नागिरी कडे येत असताना दरीत कोसळून अपघात झाला असून सदर घटनेत 18 प्रवासी जखमी झाले

रत्नागिरी येथील पोलीस नियंत्रण कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट तालुका. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी येथे खाजगी ट्रॅव्हल क्र. MP 13 P 1371 बस रत्नागिरी कडे येत असताना दरीत कोसळून अपघात झाला असून सदर घटनेत 18 प्रवासी जखमी झाले आहेत. सदर सर्व जखमी यांना जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सखरपा PHC येथे दाखल करण्यात आलेले आहे..साखरपा येथील पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने जखमीना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा व गंभीर जखमींना शासकिय रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवले आहे..धुक्या मुळे अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.पुढील तपास साखरपा पोलिस करीत आहेत

Breaking News

चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन-- 👉चिपळूण- निवळी तानाजीराव चोरगे शिक्षण...