कोकण बँकेच्या प्रगतीच्या वाट चालीतील आणखी एक ऐतिहासिक विजय–
चेअरमन आसिफ दादन व मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी यांच्या वर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव-
अनेक वर्षांपासून लढत असलेल्या एक महत्त्वपूर्ण लढाईला आले यश–
👉🏻कोकण बँकेला स्वतःचा Direct RTGS/NEFT Code मिळावा, हे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलेले स्वप्न अखेर आज साकार झाले आहे. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक व महत्त्वाचा आहे.
गेली अनेक वर्षे बँकेकडे स्वतःची थेट RTGS/NEFT सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रसंगी ग्राहकांच्या नाराजीला आणि कटू बोलण्यालाही सामोरे जावे लागत होते. मात्र, या अडचणींवर मात करत आपण आपले ध्येय आणि स्वप्न कधीही सोडले नाही.
आज मिळालेले हे उल्लेखनीय यश म्हणजे आपल्या सन्माननीय अध्यक्ष महोदयांचे, संपूर्ण संचालक मंडळाचे, समर्पित CEO महोदयांचे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी, आणि कर्मचारीवृंद यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे, एकजुटीचे, दृढनिश्चयाचे आणि अथक परिश्रमांचे फलित आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल आपल्या बँकेचे सन्माननीय अध्यक्ष मा. श्री. आसिफ दादन आणि संपूर्ण संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी, सातत्यपूर्ण पाठबळ आणि विकासाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे.
त्याचप्रमाणे, बँकेचे समर्पित CEO मा. श्री. अकबर कोंडकरी सर्व वरिष्ठ अधिकारी, आणि कर्मचारीवृंद यांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आपल्या IT विभागाचे विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार! त्यांच्या अथक परिश्रमांमुळे, तांत्रिक कौशल्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे.
आज आपण केवळ Direct RTGS/NEFT Code मिळवलेला नाही, तर आपल्या बँकेच्या प्रगतीच्या, प्रतिष्ठेच्या आणि उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नसून, संपूर्ण कोकण बँक परिवाराच्या एकजुटीचे, मेहनतीचे आणि सामूहिक विजयाचे प्रतीक आहे!
अल्हम्दुलिल्लाह!
अल्लाह तआला आपल्या कोकण बँकेवर सदैव कृपादृष्टी ठेवो आणि बँकेला यश, भरभराट, प्रगती व असेच अनेक नवनवीन यशाचे शिखर गाठण्याची संधी प्रदान करो. आमीन!
संपूर्ण कोकण बँक परिवाराचे हार्दिक अभिनंदन!
