रत्नागिरीकोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग अखेर मार्गी; 40 वर्षांचे स्वप्न- साकारणार प्रत्यक्षात!

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग अखेर मार्गी; 40 वर्षांचे स्वप्न- साकारणार प्रत्यक्षात!

Kolhapur Vaibhavwadi Railway Project : गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेने जोडण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाला पुढील वर्षी २०२७ साली प्रारंभ होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीपैकी ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यातून कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला केंद्र शासनाचा हिस्सा असलेल्या ३ हजार ४११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद होणार आहे. त्यासह राज्य शासनही आपला हिस्सा तत्काळ देणार असून लवकरच या मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावे ही गेल्या ४० वर्षापासूनची मागणी होती. २५ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ३ हजार २४४ कोटींच्या या मागीला मंजुरी देत निधीचीही तरतूद केली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सेदारीतून हा प्रकल्प उभारला जाईल, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर या मागीचे सर्व्हेक्षण, डीपीआर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आदी विविध प्रक्रिया पूर्ण झाल्या. मात्र, याकरिता तब्बल पावणेदहा वर्षांचा कालावधी गेला. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यातून महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी विविध कामांकरिता एकूण ३० हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट कोल्हापूर-वैभववाडी या मार्गाला मंजुरी देताना २०१६ साली त्याचा खर्च मार्गाचा ३ हजार २४४ कोटी होता. यानंतर केंद्र व राज्य शासन यांच्या ५०-५० टक्के भागीदारीतून होणाऱ्या या प्रकल्पासाठी २०१७ मध्ये ३ हजार ८३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रकल्प रखडला. गेल्या पावणेदहा वर्षांत या प्रकल्पाचा खर्च जवळपास दुप्पट म्हणजे ६ हजार ३०० कोटींवर गेला आहे.

केंद्र शासन देणार आपला हिस्सा

या प्रकल्पासाठी केंद्र शासन आपला हिस्सा ३ हजार ४११ कोटी रुपये देणार आहे. नव्या रेल्वे मार्गासाठी एकूण ३२ हजार २३५ रुपये खर्च होणार आहेत. त्यात या प्रकल्पाचाही समावेश आहे. राज्य शासनही आपला हिस्सा २ हजार ८८९ कोटी रुपयेही तत्काळ उपलब्ध करून देणार आहे.

भूसंपादसाठी १२०० कोटी या प्रकल्पासाठी एकूण ६३८.६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे भूसंपादन जिल्हानिहाय केले जाणार असून त्यालाही लवकरच प्रारंभ होणार आहे. भूसंपादन सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे यापूर्वीच आदेश ११ डिसेंबर २०२५ रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात बंदरे विकास विभागाचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयगड, आंग्रे, रेडी व विजयवाडा बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करावा. या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. या मार्गासाठी भूसंपादन सुरू करावे, असे आदेशही दिले होते.

दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोठे योगदान कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गााठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनचे हे स्वप्न सत्यात उतरत आहे. यामध्ये दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोठे योगदान आहे. या मार्गासाठी डॉ. जाधव यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला.

चार दशकांची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांची ही जिव्हाळ्याची मागणी तडीस नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. दै. ‘पुढारी’चा ३ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापुरात अमृतमहोत्सवी सोहळा झाला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.

या सोहळ्यात डॉ. जाधव यांनी कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. त्याचवेळी प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. यानंतर २५ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे अर्थसंकल्पात ३ हजार २४४ कोटी रुपयांच्या या मार्गाला मंजुरी दिली. त्यातील केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या १३७५ कोटी रुपयांचीही तरतूदही केली होती. यानंतरही डॉ. जाधव यांनी सातत्याने या मार्गाबाबत पाठपुरावा सुरूच होता. अखेर हा मार्ग आता साकारणार आहे.

असा आहे प्रकल्प

  • एकूण लांबी : १०७.६५ कि.मी.
  • भूसंपादन : ६३८.६
  • हेक्टरी खर्च : ६ हजार ३०० कोटी
  • तरतूद : केंद्र व राज्य सरकार (संयुक्त कंपनी प्रत्येकी ५० टक्के)
  • कालावधी : ५५ महिने
  • २७ बोगदे, ५५ उड्डाणपूल

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांतून आणि कोकणातील वैभववाडी तालुक्यातून जाणारा हा मार्ग निसर्गाच्या कुशीतून जाणार आहे. या मार्गावर २८ कि. मी. लांबीचे एकूण २७ बोगदे असतील. सर्वात मोठा बोगदा ३.९६ कि.मी. लांबीचा आहे. २ कि. मी. पेक्षा जादा लांबीचे ३ तर त्यापेक्षा कमी लांबीचे २४ बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील ५५ उड्डाणपूल, रस्त्याखालील ६८ पूल असतील. यासह छोटे पूल ७४ तर मोठे पूल ५५ असतील. या मार्गावर एकूण दहा स्थानकेही प्रस्तावित आहेत.

व्यापार, उद्योगाला चालना

या रेल्वे मागनि देशाची पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी थेट रेल्वेमागनि जोडली जाणार आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार, उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

Breaking News

खालगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्का –  उदय सामंत

जाकादेवी :- रत्नागिरी तालुक्यासह करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये व...

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

बारामती: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे...