Uncategorizedगणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवार दिनांक सकाळच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आहेत. सध्या हे पाचही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


सकाळी १० च्या सुमारास घडली दुर्घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे शुक्रवारी 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास दाखल झाला होता. हा ग्रुप देवदर्शन व पर्यटनासाठी खाजगी वाहनाने आला होता. या ग्रुपने 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजिंग वर मुक्काम केल्यानंतर वीस रोजी सकाळी गणपती मंदिरात जाऊन स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यातील पाच जण समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले उर्वरित 14 जण समुद्र चौपाटीवर थांबले होते. मात्र, समुद्रात अंघोळीसाठी उतरलेले पाच जण पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.
स्थानिक नागरिक अन् जीवरक्षकांची धाव*
पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला.
बचाव कार्यात पाण्याचा ‘करंट’ ठरतोय अडथळा
सध्या समुद्रात पाण्याचा करंट (पाण्याचा वेगवान प्रवाह) प्रचंड प्रमाणात आहे. समुद्राला उधाण असल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह खेचणारा असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. समुद्रात बुडालेल्या पाच जणांमध्ये आदित्य संतोष राऊत वय वर्षे 22 ,अनिकेत बंडू हिवराळे वय वर्षे 20, आनंद राजू नरवडे वय वर्ष 20 ,प्रेम दीपक आदमाने वय वर्षे 19, यश रामेश्वर कांबळे वर्षे 19 सर्व राहणार बीडकिंन, जिल्हा संभाजीनगर ,तालुका पैठण यांचा समावेश आहे. या पाच जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून त्यांचा तात्काळ शोध कस्टम आणि मच्छीमार बोट दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. समुद्रात बुडालेले पाच जण अविवाहित असून ते आपल्या मित्रांसमवेत देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. दरम्यान गणपतीपुळे येथे समुद्रात पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी गणपतीपुळे समुद्रकिनारी भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेऊन समुद्रकिनारी असलेल्या पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान, समुद्रात बुडालेल्या पाच तरुणांना वाचविण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने तैनात केलेले होमगार्ड संदेश धावडे, अंकुश घाणेकर जीवरक्षक आशिष माने, उमेश म्हादये,व्यावसायिक केतन धनावडे ,रोहित चव्हाण, मुबारक सुतार आदींनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न केले .तसेच त्यांच्या जोडीला समुद्रकिनारी तैनात असलेले अन्य होमगार्ड, , पोलीस कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिक यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान समुद्रकिनारी घडलेली मोठी दुर्घटना लक्षात घेता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी समुद्रकिनाऱ्यावर विशेष गस्त घालून पर्यटकांना समुद्राच्या धोक्याविषयी सुचेना व माहिती देण्याचे काम करीत आहेत. दरम्यान गणपतीपुळे येथे मोठ्या गर्दीचा उन्हाळी पर्यटन हंगाम चांगल्या स्थितीत गेल्यानंतर पावसाळी पहिल्या जून महिन्यातच ही घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटकांना वेळोवेळी समुद्राच्या धोक्याविषयी सूचना देण्याचे काम पोलीस यंत्रणा जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून केले जाते मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करताना त्यातच अशा घटना घडून गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला गालबोट लागत असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र अजूनही पावसाळी स्थिती लक्षात घेऊन आलेल्या पर्यटकांनी समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करताना समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...