माणुसकीच्या सेवेतून मिळाला नवजीवनाचा आधार!* *👉🏻रविंद्र चव्हाण साहेब आणि अनिकेत पटवर्धन यांचे आभार मानावे तेवढे कमीच पडतील—
👉🏻माननीय श्री. रवींद्र चव्हाण साहेब, माजी मंत्री आमदार व प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय श्री. अनिकेतजी पटवर्धन साहेब यांच्या सहकार्याने आमच्या कुटुंबाला कठीण प्रसंगी मोठा आधार मिळाला.
माझा मुलगा कुमार गोरांग गणेश भोसले, रा. भगवती नगर, रत्नागिरी, हा जन्मापासून मूकबधिर असून त्याच्यावर स्पाइनच्या आजारामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. या उपचारांसाठी सुमारे ७ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.
अशा वेळी श्री. राजेंद्र भाटलेकर यांच्या माध्यमातून आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांपर्यंत पोहोचलो. साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि अनिकेतजी पटवर्धन साहेबांच्या सहकार्याने श्री. अशोक सानप साहेब, आरोग्य सेवक श्री. तेजस चौधरी आणि आदरणीय डॉ. क्षितिज चौधरी सर यांनी उपचारांसाठी मोलाचे सहकार्य केले. हिंदुजा रुग्णालयातील व्यवस्थापनाचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
या सर्वांच्या मदतीमुळे आमच्या मुलाची शस्त्रक्रिया पार पडली आणि आमच्या कुटुंबाला नव्या आशेचा किरण मिळाला.
या कठीण काळात माणुसकी जपत आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. गणेश भोसले भगवती नगर रत्नागिरी
