रत्नागिरीगोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमचा दौरा संपन्न

गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमचा दौरा संपन्न

गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमचा दौरा संपन्न
महिला उद्योजकांचे कौतुक
रत्नागिरी, (जिमाका):- गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमने 11 व 12 मे रोजी नाचणे येथील धनज्योती महिला प्रभागसंघ व कोतवडे येथील एकता महिला प्रभाग संघाला अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली. हा दौरा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व जिल्हा अभियान सहसंचालक विजयसिंह जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या डॉ. सरिता पाटील, श्रीमती विजया लक्ष्मी, श्रीमती सुनैना यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रभागसंघ कार्यालयाची पाहणी कार्यालयातील दप्तर व दस्तऐवज व्यवस्थापन, प्रभागसंघाच्या मासिक बैठका, विविध उपसमित्यांचे कामकाज, पदाधिकाऱ्यांचे रोटेशन, कॅडर व्यवस्थापन, स्पियर हेड टीमची कार्यपद्धती, आर्थिक नियमन, उपजीविका विकास अंतर्गत विविध योजनांचे कृतीसंगम, ग्रामसंघ बैठका, समूह-ग्रामसंघ-प्रभागसंघ यांतील समन्वय, कर्ज परतफेड प्रणाली, तसेच लेखा व्यवस्थापन व समूह, ग्रामसंघ आणि प्रभागसंघ स्तरावरील ऑडिट प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उपजीविका विषयक कामकाजाच्या अनुषंगाने आंबा प्रक्रिया युनिटलाही भेट देवून कृती संगम अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजने अंतर्गत मिळालेल्या निधीतून उभारलेले उपक्रम तसेच व्यवसायातील पॅकेजिंग, लेबलिंग, लॅब टेस्टिंग, ई-प्लॅटफॉर्मद्वारे विक्री व्यवस्था इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
12 मे 2026 रोजी रत्नागिरी तालुक्यातील एकता महिला प्रभाग संघ कोतवडे येथे भेट दिली. भेटी दरम्यान गणपतीपुळे येथील बीच वर असणाऱ्या समूहातील महिलांनी घेतलेल्या एटीव्ही बाईक ला भेट दिली व या एटीव्ही बाईक वर फेरफटका मारला. प्रभागसंघ अध्यक्ष यांच्या टुरिझम उपजीविकेस भेट देवून मालगुंड गावामधील अभियान निधी मधून उभारलेल्या जय अंबे समूहातील दीपिका सुर्वे यांच्या सायनी हाऊस अँड रेस्टो ह्या प्रसिद्ध रिसॉर्ट ला भेट दिली. रिसॉर्टच्या मॅनेजमेंट बाबत घेवून कायाकिंग प्रकल्पाचे कौतुक केले. एकता महिला प्रभाग संघ कार्यालय नेवरे येथील प्रभागसंघाचे, केडर यांचे कामकाज त्याच्या भूमिका व जबाबदारी तसेच प्रभाग संघांत येणारे ग्रामसंघ व विविध प्रकारच्या उपजीविका याची माहिती घेतली. कोतवडे गावातील हिरकणी समूहातील महिलेने स्थापन केलेल्या काजू व्यवसायाला तसेच दुर्गामाता समूहातील महिलेने तयार केलेले गांडूळ खताबाबत माहिती घेतली.
प्रभागाच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन अभ्यास दौऱ्याच्या स्मरणार्थ प्रभागसंघ यांना स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...