जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
रत्नागिरी जिल्ह्यातील १०० खेळाडूंचा सहभाग; विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी अंतर्गत स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी, तालुका, जिल्हा रत्नागिरी द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवनिर्माण हायस्कूल, एमआयडीसी, रत्नागिरी येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांतील सुमारे १०० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धा क्वाड स्केट व इनलाइन स्केट या दोन प्रकारांत तसेच रोड रेस, रिंक-१ आणि रिंक-२ या प्रकारांत घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी शिवसेना महिला उपशहर प्रमुख सौ. कामना अरुण बेग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी खेड तालुका सचिव श्री. विजय निगडेकर, चिपळूण तालुका सचिव सौ. योगिता पाटणे, दापोली तालुक्याचे श्री. प्रथमेश दाभोळे, चिपळूणचे श्री. विनोद राऊत, रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. अरुण बेग तसेच विविध शाळांतील क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
क्वाड स्केट प्रकारातील विजेते
११ वर्षांखालील मुले
- प्रथम : सुनील मेश्राम
- द्वितीय : स्वतेज लाड
- तृतीय : शिवांश केनन
११ वर्षांखालील मुली
- प्रथम : आराध्या पाटणे
- द्वितीय : आदिती लाल
- तृतीय : सांगवी पिळणकर
१४ वर्षांखालील मुले
- प्रथम : वेदांत नागले
- द्वितीय : आरव महाडिक
- तृतीय : जय पाड्लेकर
१४ वर्षांखालील मुली
- प्रथम : सानवी दरेकर
- द्वितीय : तीर्था खाडे
- तृतीय : अलिषा परकर
१७ वर्षांखालील मुले
- प्रथम : वेदांत सनगरे
- द्वितीय : हर्ष आंब्रे
- तृतीय : स्मित जाधव
१९ वर्षांखालील मुले
- प्रथम : निशांत जाधव
इनलाइन स्केट प्रकारातील विजेते
११ वर्षांखालील मुले
- प्रथम : मुसा खान
- द्वितीय : ललित मुरकर
- तृतीय : जाकीर पटेल
११ वर्षांखालील मुली
- प्रथम : मुक्ता गोविलकर
- द्वितीय : सिमरा चाऊस
- तृतीय : इन्शा पटेल
१४ वर्षांखालील मुले
- प्रथम : श्लोक डेरे
- द्वितीय : माझीन मुकादम
- तृतीय : अरसलान खान
१४ वर्षांखालील मुली
- प्रथम : ऐश्वर्या सावंत
- द्वितीय : मायशा चाऊस
- तृतीय : अनिया नागदेवे
१७ वर्षांखालील मुले
- प्रथम : ध्रुव बसणकर
- द्वितीय : स्वराज पवार
- तृतीय : हेरंब लोंढे
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंना क्रीडा अधिकारी श्री. गणेश जगताप सर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे सर यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकवर्ग आणि स्केटिंग असोसिएशन रत्नागिरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागीय स्पर्धेतही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
