छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर; खेडशी नाक्यावर साकारला गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास!

0
8

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर; खेडशी नाक्यावर साकारला गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास!

रत्नागिरीतील खेडशी नाका येथे शिवशक्ती ग्रुपच्या वतीनं दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेल्या पन्हाळगड, पावनखिंड आणि विशालगड यांच्या भव्य प्रतिकृतींची आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पाहणी केली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं.

यावेळी बोलताना, शिवशक्ती ग्रुपच्या तरुणांनी अत्यंत बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं साकारलेल्या या प्रतिकृतींमधून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आणि मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाच्या आठवणी जाग्या झाल्या.

यावेळी माता-भगिनींनी केलेलं औक्षण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिवशक्ती ग्रुपचे श्री. राजेशदादा पेडणेकर यांनी केलेलं आपुलकीचं आदरातिथ्य मनाला भावलं. गेल्या ११ वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचं मोलाचं कार्य शिवशक्ती ग्रुप करत आहे.

विशेष म्हणजे, माझ्याच मतदारसंघातील तरुण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा एवढा सखोल अभ्यास करून आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी झटत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे म्हणत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी शिवशक्ती ग्रुपला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here