जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयी आणि अपुऱ्या सुविधांबाबत मनसेच्या पाठपुराव्याला उल्लेखनीय यश

0
4

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयी आणि अपुऱ्या सुविधांबाबत मनसेच्या पाठपुराव्याला उल्लेखनीय यश : वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे लिखित आश्वासन

महाराष्ट्र नवनिर्माण रत्नागिरीच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश मिळाले असून मनसेच्या खालील मागण्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून तत्परतेने कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनसे उप जिल्हा अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या सातत्यपूर्व प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे.

मेंदूविकार, हृदयरोग आदी गंभीर आजारांवर तज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून काही गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात संपर्क करण्यासाठी यापुढे स्वतंत्र कक्षाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात आली असून लवकरच निःशुल्क हेल्पलाइन यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे यामुळे उपचारास विलंब कमी होऊन रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांची तात्पुरत्या निवासाची परवड यापुढे थांबणार असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वमालकीच्या दोन ॲम्ब्युलन्स यंत्रणा DPDC कडून नाममात्र दरात उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरोत्तर सर्वसामान्य रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील असून याहीपुढे मनसे आपल्या पद्धतीने जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन मनसे उप जिल्हा अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी केले असून प्रशासनाच्या या सकारात्मक कार्यवाहीचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here