झाडगाव चे नाव झाले तुंबाड–??
👉मिऱ्या कोल्हापूर नागपूर महामार्गावरील चंपक मैदाना समोरुन जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक बोर्ड लावण्यात आला आहे तो म्हणजे तुंबाड.. त्यामुळे सर्वांसमोरच प्रश्न पडला आहे तो म्हणजे महामार्गवाल्यांनी झाडगाव चे नाव बदलून तुंबाड कधी केले.. कोल्हापूर नागपूर महामार्गावरील चंपक मैदाना समोर असलेल्या डॉक्टर औरंगाबादकर यांच्या चिंतामणी हॉस्पिटलच्या थोडं पुढे एक दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे ज्यावर डावीकडे “तुंबाड” असा उल्लेख आहे…
कुणी जाणकार सांगेल का, हा फलक खरंच एखाद्या तुंबाडकडे घेऊन जातो की थेट हस्तरच्या खजिन्याकडे?
माझ्या माहितीनुसार तरी त्या भागात तुंबाड नावाचं ठिकाण नाही. की इतकी वर्षं मीच काहीतरी मिस केलंय?
कृपया माहिती द्या. नाहीतर उत्सुकतेपोटी एक दिवस त्या दिशेने गाडी वळवून “तुंबाड” शोध मोहीम काढावी लागेल! कारण हा एरिया गेल्या अनेक वर्षांपासून झाडगांव एमआयडीसी म्हणूनच ओळखला जात आहे .. आता महामार्ग वाल्यांनी तुंबाड म्हणून बोर्ड कसे लावले याची माहिती वेळीच मिळाली पाहिजे
