झाडगाव रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वॉटर कुलर व युव्ही वॉटर फिल्टरचे लोकार्पण

0
16

झाडगाव रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वॉटर कुलर व युव्ही वॉटर फिल्टरचे लोकार्पण–
👉🏻रत्नागिरी,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या झाडगाव (रत्नागिरी) येथील ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर कुलर आणि युव्ही (UV) वॉटर फिल्टरचे औपचारिक हस्तांतरण व लोकार्पण करण्यात आले. या संशोधन केंद्रातील मत्स्यालय आणि संग्रहालयाला दरवर्षी सुमारे २ लाख विद्यार्थी, अभ्यासक व पर्यटक भेट देतात. या सर्व पर्यटकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशातून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे ‘वॉटर कुलर’ तर इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे ‘युव्ही वॉटर फिल्टर’ भेट म्हणून प्रदान करण्यात आला.

या सुविधेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. लेनी दा कोस्टा (गोवा) यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाले. तर ‘युव्ही वॉटर फिल्टर’ चे उद्घाटन इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा चौधरी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर डॉ. पालशेतकर रोटे. डॉ. संदीप करे (पीटी) – अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, रो. सीताराम सावंत – सचिव, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन रो. विनायक निकम – खजिनदार, वरिष्ठ रोटेरियन श्री राजेंद्र कदम, श्री बिपिन चंद्र गांधी, श्री सिताराम सावंत सर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, सौ. सुवर्णा चौधरी – अध्यक्षा, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी, डॉ. प्रियंका कांबळे सचिव, सोनाली आयरे – एडिटर, प्रज्ञा गांधी, आय एस ओ, वरिष्ठ सदस्य सौ श्रद्धा सावंत, ऋचा गांधी व शुभांगी तापेकर उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या शेवटी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतनकुमार चौधरी यांनी पर्यटकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here