देवूड गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती

0
11

देवूड गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती !

रत्नागिरी तालुक्यातील देवूड गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झाले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामस्थांना अधिक सक्षम आणि सुलभ प्रशासकीय सेवा मिळवून देणे, तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे ग्रामस्थांना प्रशासकीय कामकाजासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर गावातील इतर विकासकामांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

गावाचा विकास म्हणजे केवळ इमारती उभारणे नव्हे, तर प्रत्येक ग्रामस्थाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे होय. गावागावांत दर्जेदार सुविधा पोहोचवून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, जिल्हा परिषद शिवसेना पक्षप्रतोद बाबूशेठ म्हाप, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, सरपंच संजय देसाई, गटविकास अधिकारी श्री. शेळके, संस्थेचे चेअरमन श्री. नलावडे, आप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य कांचन नागणेकर, नेहा गावणकर, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, विभाग संघटक मिलिंद खानविलकर, उप तालुकाप्रमुख स्वप्नील देसाई, अभय खेडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here