रत्नागिरीनवनिर्माण महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

नवनिर्माण महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

नवनिर्माण महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण महाविद्यालयात ११ जुलै २०२६ रोजी जागतिक लोकसंख्या दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात भित्तिपत्रक अनावरण, निबंध स्पर्धा तसेच पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयोजित स्पर्धामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत लोकसंख्या, विकास आणि जनजागृती या विषयांवर प्रभावी मांडणी केली.
नवनिर्माण ज्युनियर कॉलेज पोस्टर स्पर्धेचे निकाल
प्रथम – सना निंबाड 12 वी कला, द्वितीय – समीक्षा काटे 12 वी, वाणज्य, तृतीय – महक खोपेकर व विधी कापडी 12 वी कला.
निबंध स्पर्धेचे निकाल
प्रथम – अक्षदा माने 12 वी कला , द्वितीय – सना निंबाड 12 कला, तृतीय – सादिन खान व रिया माटल 12 वी वाणिज्य
एस. पी. हेगशेटये महाविद्यालय निबंध स्पर्धेचे निकाल
प्रथम – पूजा शर्मा (टी.वाय.बी.एम.एस.), द्वितीय – तन्वी कळंबटे (एफ.वाय.बी.ए.), तृतीय – शर्वरी घडशी (टी.वाय.बी.कॉम.), चौथा – राधिका देवरुखकर (एफ.वाय.बी.एम.एस.). उत्तेजनार्थ – विनय बोले (एफ.वाय.बी.ए.) व आयशा सावकार (टी.वाय.बी.ए.).
पोस्टर स्पर्धेचे निकाल
प्रथम – रिया उके (एफ.वाय.बी.एम.एस.), द्वितीय – सना मजगांवकर (टी.वाय.बी.कॉम.), तृतीय – इन्शा धामसकर (एफ.वाय.बी.ए.), चौथा – सानिया पवार (टी.वाय.बी.ए.). उत्तेजनार्थ – ईश्वरी देसाई (एफ.वाय.बी.एम.एस.) व सलोनी सागवेकर (एफ.वाय.बी.बी.आय.)
कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुकुमार शिंदे यानी वाढत्या लोकसंख्येचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम, लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व तसेच भारतासमोरील आर्थिक व सामाजिक आव्हाने यावर मार्गदर्शन करण्यात केले. तर प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी वाढती लोकसंख्या काही देशांसाठी संधी ठरत असली, तरी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी लोकसंख्या विषयक जनजागृतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभाग प्रा वर्षा कुबल यानी केले.
याप्रसंगी डॉ. राजेश कांबळे, प्रा. अश्विन कांबळे, प्रा. निकिता नलावडे, प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा. शिउडकर प्रा. रोहित यादव तसेच महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी, सर्व शिक्षकवर्ग व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसचालन प्रा. सुशील साळवी यानी केले.

Breaking News