निवळी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित एक दिवस बंधाऱ्यासाठी कार्यक्रमाला भेट देण्यासाठी निवळी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदही रानाडे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री सागर पाटील रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री शेळके हातखंब पंचायत समितीच्या सदस्या सौ विद्याताई बोंबले हे सर्व वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी हजर राहिले

0
7

त्याशिवाय या कार्यक्रमाला आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला आरोग्य सेवक तलाठी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये यामध्ये  दिनांक 26 ऑक्टोबर 2026 रोजी पर्यंत मालपवाडी गावडेवाडी येथे चार कच्चे बंधारे व कोकजे वठार येथे एक कच्चा बंधारा बांधण्यात आला त्याशिवाय कोकजे वठार ब्रिज जवळ नदीपत्राला भव्य दोन वनराई बंधारे बांधण्यात आले हे सर्व बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याशिवाय ग्रामपंचायत सरपंच तन्वी कोकजे उपसरपंच संजय निवळकर ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा शिवगण ग्रामपंचायत सदस्य दीपक रहाटे ग्रामपंचायत सदस्य दक्षिण गावडे ग्रामपंचायत सदस्य संतोष मालप ग्रामपंचायत सदस्य सौ देवरुखकर त्याशिवाय ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी यांचा या नियोजनामध्ये मोलाचा वाटा व सहकार्य लाभले आजच्या तारखेपर्यंत किमान सहा बंधारे बांधून झाले असून किमान 20 बंधारे बांधण्याचा निवळी ग्रामपंचायतचा संकल्प असून या संकल्प मध्ये निवळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या गावाला मुबलक पाणी मिळून इतर गावांना पाणी मिळावे व इतर गावांची तहान भागवावी असं ध्येय बांधून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे जनतेतून या सर्व कामाबद्दल चांगली चर्चा असून जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे पाणी टंचाईची भीषण समस्या डोळ्यासमोर ठेवून उपसरपंच संजय निवळकर यांनी यांनी ग्रामपंचायत माध्यमातून दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे सर्व जनता व अधिकारी कौतुकाचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here