पत्रकार सिकंदर फरास यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

0
6

पत्रकार सिकंदर फरास यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

साखरपा: रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे गावचे सुपुत्र आणि ग्रामीण पत्रकारितेत आपल्या धारदार लेखणी व तत्पर समाजकार्याचा वेगळा ठसा उमटवणारे पत्रकार सिकंदर युसुफ फरास यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. पर्यावरण, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या रविवारी २२ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले जाईल.

संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या व्यथा, तसेच दुर्गम गावांतील रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची वानवा आणि प्रशासकीय दिरंगाई या विषयांवर सिकंदर फरास यांनी निःपक्षपाती व निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला आहे.

केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, प्रशासकीय पातळीवर सक्रिय पाठपुरावा करून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या याच लोकहितैषी व रचनात्मक कार्याची दखल घेत ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ संस्थेने त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या निवडीमुळे ‘ग्रामीण वार्ता’ परिवारासह संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पत्रकारिता, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here