रत्नागिरीभीम युवा पँथरच्या तत्परतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील तुटलेले गेट दुसर्‍याच...

भीम युवा पँथरच्या तत्परतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील तुटलेले गेट दुसर्‍याच दिवशी दुरुस्त

भीम युवा पँथरच्या तत्परतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील तुटलेले गेट दुसर्‍याच दिवशी दुरुस्त

रत्नागिरी नगरपरिषदेची तातडीने दखल; संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मानले आभार

रत्नागिरी : शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या संरक्षक कंपाउंडचे गेट एका अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटले. या घटनेची माहिती मिळताच भीम युवा पँथर (रजि.) संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून तुटलेल्या गेटची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली. संघटनेच्या पाठपुराव्याची दखल घेत नगरपरिषदेने दुसर्‍याच दिवशी दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कंपाउंड गेटला एका अज्ञात वाहनाने रिव्हर्स घेताना धडक दिली. या धडकेत गेटचा कठडा तुटून नुकसान झाले. ही बाब निदर्शनास येताच भीम युवा पँथरच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधून गेटची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची नगरपरिषद प्रशासनाने त्वरित दखल घेत घटनेच्या दुसर्‍याच दिवशी दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण केले. तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल भीम युवा पँथरच्या पदाधिकार्‍यांनी नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले. दरम्यान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍या अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास भीम युवा पँथर संघटना गप्प बसणार नाही, असा इशाराही पदाधिकार्‍यांनी दिला.

Breaking News

पाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारा

💧 💧 पाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारा💧 💧 महाराष्ट्र...

भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट

भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट दुर्देवी घडलेल्या...