मुंबई गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे शिवसेना हिरकमहोत्सवी ६० व्या वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथ रावजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांचा अथांग उत्साह अनुभवला.
याप्रसंगी शिवसेनेचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
