मुंबई–गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर अपघात; जखमी प्रवाशांची पालकमंत्र्यांकडून जिल्हा रुग्णालयात जावून विचारपूस

0
9

मुंबई–गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर अपघात; जखमी प्रवाशांची पालकमंत्र्यांकडून जिल्हा रुग्णालयात जावून विचारपूस
रत्नागिरी, (जिमाका): मुंबई–गोवा महा मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजणारी पुलावर काल पहाटे ट्रक आणि खासगी बसची धडक झाली. या दुर्घटनेत बसमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून सर्व जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली..
यावेळी डॉक्टरांकडून जखमींच्या सद्यस्थितीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेण्यात आली. “जखमींना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात,” अशा स्पष्ट सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्यासह रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here