रत्नागिरीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी पदाचा
अरांक्षा यादव यांनी स्विकारला पदभार- मावळते उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांना देण्यात आला आदरपूर्वक निरोप.. विद्यमान उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघरला झाली बदली
👉रत्नागिरीच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदाची धुरा आता २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांनी स्वीकारली आहे. मावळते उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी अधिकृतरित्या त्यांच्याकडे पदाचा कार्यभार सुपूर्द केला.
नीलेश माईनकर यांची पालघर येथील जातपडताळणी विभागात बदली झाली असून, त्यांनी रत्नागिरीत कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली. यापूर्वी त्यांनी नाशिक शहर व ग्रामीण, जळगाव, गोंदिया, गडचिरोली, रायगड ग्रामीण, पालघर आणि मुंबईतील विशेष सुरक्षा विभागात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
माईनकर यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या अरांक्षा यादव यांनी सोमवारी रत्नागिरीत पदभार स्वीकारला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये देशात २०२ वा क्रमांक मिळवत त्यांनी आयपीएस सेवेत प्रवेश केला. मूळच्या हरियाणातील असलेल्या यादव यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे शिक्षण घेतले आहे.
रत्नागिरीच्या कायदा व सुव्यवस्थेला नवे नेतृत्व मिळाल्याने प्रशासनासह नागरिकांमध्येही अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.
