रत्नागिरीरत्नागिरीच्या समुद्रात 'ऑपरेशन क्लीन-सी'चा धडाका

रत्नागिरीच्या समुद्रात ‘ऑपरेशन क्लीन-सी’चा धडाका

LED माफियांचे धाबे दणाणले

👉रत्नागिरी – प्रतिनिधी
अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन क्लीन-सी’ अंतर्गत मोठी मोहीम उघडली आहे. जयगडपासून दाभोळपर्यंतच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी भागात विभागाने सर्च मोड ऑन केला असून, गेल्या काही दिवसांत सलग कारवाया करत अवैध LED मासेमारी करणाऱ्या नौकांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या कारवाईमुळे मत्स्य संपत्तीची लूट करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. समुद्रातील उग्र लाटा आणि अंधाराचा फायदा घेत LED च्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या ३ नौकांना विभागाने रंगेहाथ पकडले. ‘मिडनाईट हंट’च्या या थरारक कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विभागाचे हे सत्र येथेच थांबले नाही. ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २:१७ वाजता मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान गस्त घालत असताना “भराडी प्रसन्न” (IND-MH-04-MM-3723) ही नौका LED साधनांसह रंगेहाथ जप्त करण्यात आली. त्यानंतर, ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गुहागर-दाभोळ परिसरात पुन्हा एकदा ‘डबल स्ट्राईक’ करण्यात आला. यावेळी “सफा मरवा-१” (IND-MH-4-MM-4041) ही नौका अवैध मासेमारी करताना सापडली. ही नौका सध्या दाभोळ बंदरात जप्त करून ठेवण्यात आली आहे.

या यशस्वी मोहिमेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सौ. दिप्ती साळवी (दाभोळ) आणि श्री. स्वप्निल चव्हाण (गुहागर) यांनी नेतृत्व केले. त्यांना सागरी सुरक्षा पर्यवेक्षक प्रशांत येलवे, विनायक शिंदे तसेच सुरक्षा रक्षक राजन शिंदे, योगेश तोस्कर व प्रतीक शिर्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जप्त करण्यात आलेल्या सर्व नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अध्यादेश २०२१ अंतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सर्व प्रकरणे आता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडे न्यायनिर्णयासाठी सादर केली जाणार आहेत. यापुढील काळातही ही मोहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...