रत्नागिरीरत्नागिरी येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेसाठी राज्याचे...

रत्नागिरी येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेसाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

रत्नागिरी येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेसाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनाला ११ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन माहितीचा लाभ घेतला. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढेल असा विश्वास या निमित्तानं ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.

शेतकरीहित डोळ्यासमोर ठेवून अशाप्रकारच्या कृषी प्रदर्शनांची संख्या भविष्यात वाढवली जाईल, असं आश्वासन ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी दिलं. माझ्या रत्नागिरी मतदारसंघातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा निश्चितच उपयोग होणार आहे. या प्रदर्शनाचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आयोजकांचं कौतुक केलं.
शेतीसाठीचं उपयुक्त असणारं विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही परिचय कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाला. शेतीमधले नवनवीन प्रयोग, त्यामाध्यमातून उत्पादन वाढीसाठी कशाप्रकारे मदत होईल, हे देखील या सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार अशा कार्यक्रमांना कायमच मदत करेल आणि भविष्यातही सर्वोतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी दिले.

यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री योगेशजी कदम, प्रशासनातील सर्व अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – आमदार किरण सामंत

🔴झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी...

सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी ‘अग्निवीर’ भरती मेळावा

सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी 'अग्निवीर'...