रत्नागिरीरत्नागिरी शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे ही आपली...

रत्नागिरी शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मत नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केली आहे

रत्नागिरी शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मत नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केली आहे. उत्तरदायित्वाची खात्री करण्यासाठी आज सकाळी सकाळी नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या अचानक पाहणी दरम्यान पाण्याचे शुद्धीकरण, फिल्टरेशन प्रक्रिया, पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि संपूर्ण यंत्रणेची कार्यप्रणाली कशी सुरू आहे, याचा सखोल आढावा घेतला. शहरातील प्रत्येक घरात दर्जेदार पाणी नियमितपणे आणि सुरळीतपणे पोहोचत राहावे, यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेच्या कामात पारदर्शकता व अचूकता असणे अत्यंत गरजेचे आहे. या वेळी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.
रत्नागिरीकरांच्या आरोग्याशी निगडित या अत्यंत महत्त्वाच्या सेवेचा स्तर आणखी उंचावण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत असे नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी सांगितले आहे. शुद्ध पाणी, उत्तम आरोग्य! 🚰✨

Breaking News

मिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला मेळावा संपन्न

मिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला...

कला, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

🔴 कला, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम ▶️ लांजा -...