रत्नागिरीशासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरी येथे 'आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

शासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरी येथे ‘आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

शासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरी येथे ‘आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन–..
👉 शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आत्महत्या प्रतिबंध व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम शासकीय रुग्णालय ओपीडी सभागृहात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मानसिक आरोग्याचे महत्त्व, ताण – तणाव व्यवस्थापन, कायदेशीर पैलू ( भारतीय न्याय संहिता कलम १०८ ) तसेच आत्महत्येच्या विचारांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना वेळेवर मदत व समुपदेशन मिळण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तींनी एकट्याने या समस्येला सामोरे न जाता कुटुंबीय, मित्र, डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. “मदत मागणे ही आपली कमतरता नसून धैर्याची बाब आहे, हा संदेश मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्नेहल तोडकर यांनी दिला.
या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम डॉ.अनिकेत शिरसाट, डॉ.राजेश आसोरे, डॉ.रश्मी आठल्ये, डॉ.सय्यद,अधिपरिचारिका तसेच समाजसेवा अधिक्षक कोमल गरड, मानसोपचार विभागातील समुपदेशक व कर्मचारी आणि आंतरवासिता डॉक्टर यांच्या उपस्थितीत पार पडला.
मानसिक आरोग्याबाबत समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि गरजू व्यक्तींपर्यंत मदतीची साधने पोहोचवणे, हा या जनजागृती उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सदर कार्यक्रमाला रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Breaking News

नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा

नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा-- 👉 राज्याचे उद्योग व मराठी...

गोवा शिपयार्डचा अभ्यास; सिंधुदुर्गात जहाजबांधणीला नवी दिशा

गोवा शिपयार्डचा अभ्यास; सिंधुदुर्गात जहाजबांधणीला नवी दिशा! मंत्री नितेश राणे...