श्री. संत ज्ञानेश्वर महाराज ह्यांचा ७५० वा जन्मोत्सव

0
171

एकाच महिन्यात दोन वेळा माऊलींच्या दर्शनाचं भाग्य लाभल्याची भावना यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली. त्यावेळी विश्वस्तांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचे आभार मानले.
मराठी भाषा अनुभवयाची असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पर्याय नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा पहिला प्रस्ताव २०१३ मध्ये मराठी भाषा विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी पाठवला तर माऊलींच्याच आशिर्वादाने अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा जीआर दिल्लीतून मराठी भाषा विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून आणण्याचं भाग्य मला लाभल्याची भावना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि संत ज्ञानेश्वर यांची मातृभाषा मराठीच होती, असे पुरावे सादर केल्यानंतरच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची आठवण मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी सांगितली. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या छपाईसाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा यावेळी केली. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुढील वर्षीच्या ७५१ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात कीर्तन महोत्सव आयोजित केला पाहिजे, त्याची जबाबदारी मराठी भाषा विभाग स्विकारेल, असं आश्वासन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिलं.
इंद्रायणी, पवना नदीच्या शुद्धिकरणाचं कंत्राट पुढील वर्षी निघणार असल्याची माहिती यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली. २०२३-२०२४ मध्ये मृत झालेल्या वारक-यांच्या कुटुंबियांना घोषित झालेला ५ लाख रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here