सहा आसनी विमानानंतर आता भारतीय UAV आकाशात झेपावणार- कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पाची उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली पाहणी
👉धुळे विमान तळावरील कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीच्या रिसर्च युनिटला भेट देऊन भारतीय बनावटीच्या UAV (मानवरहित विमान)निर्मितीच्या प्रकल्पाची महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भेट देऊन पाहणी केली. सहा आसनी विमानाच्या यशस्वी निर्मितीनंतर कॅप्टन अमोल यादव सध्या भारतीय बनावटीचे UAV विकसित करत आहेत. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली तसेच पुढील टप्प्यांबाबत चर्चा केली. महाराष्ट्रात एरोस्पेस आणि विमाननिर्मिती क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांना शासनाचे आवश्यक सहकार्य राहील असे म्हणाले..
यावेळी थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीचे कार्यकारी संचालक रश्मीकांत यादव आणि चीफ इंजिनियर मुनिस्वरन रघुपती उपस्थित होते.
