रत्नागिरीसावर्डे विद्यालयात हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद...

सावर्डे विद्यालयात हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

सावर्डे-सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे शीख पंथाचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे यांनी गुरु तेग बहादुरजी यांच्या त्यागमय जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन केली. त्यांनी धार्मिक सहिष्णुता, मानवतेसाठी दिलेले बलिदान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची त्यांची प्रेरणादायी भूमिका स्पष्ट केली.
यानंतर गुरु तेग बहादुरजी यांच्या जीवनावर आणि सामाजिक कार्यावर आधारित ध्वनिफीत विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आली. सकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या स्मरणार्थ प्रार्थनेचे सामूहिक गायन विद्यार्थी व शिक्षकांनी भावपूर्ण वातावरणात केले. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपूर्ण चित्रफीत दाखवण्यात आली.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे , उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण श्रद्धा, प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते. गुरु तेग बहाद्दूर यांनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या उद्धारासाठी खर्च केले इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले त्याच पद्धतीने आपण आपले जीवन समृद्ध करण्यासाठी त्यांच्या सदगुणांचा अंगीकार करावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्याग, साहस, सहिष्णुता आणि मानवतेची जाणीव अधिक दृढ झाली.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...