Home रत्नागिरी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा-

अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा-

0
अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा-

आज राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, ठाणे येथे “अभिजात मराठी भाषा सप्ताह” निमित्ताने आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. त्यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

या मराठी भाषेच्या अभिजात दर्ज्याचा प्रवास आणि सरकारकडून करण्यात आलेल्या ऐतिहासिक उपक्रमांचा आढावा घेतला. शिंदे साहेबांनी उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्यिकांचे योगदान आणि पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेचाही विशेष उल्लेख केला. मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करून २ कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय शिंदे साहेबांनी घेतल्याचे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर सांगितले.

साहित्यिकांनी शासनाच्या कामावर विधायक टीका करून दिशा दाखवावी, असा मनापासूनचा सल्लाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिला.
मराठी भाषा ही आपली मायबोली, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे. या भाषेच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि जागतिक पातळीवर तिचा गौरव करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

या कार्यक्रमात मंत्री प्रतापराव सरनाईक, राज्य साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, तसेच पद्मश्री पालव, प्राचार्य अशोक चिटणीस, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक आणि मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here