Home रत्नागिरी असुर्डे विद्यालयात संविधान दिन उत्साहात संपन्न

असुर्डे विद्यालयात संविधान दिन उत्साहात संपन्न

0
असुर्डे विद्यालयात संविधान दिन उत्साहात संपन्न

सावर्डे : सहयाद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,असुर्डे-आंबतखोल ता. चिपळूण जि. रत्नागिरी विद्यालयात संविधान दिन मोठया उत्साहात संपन्न झाला.या दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रथम शालेय परीसरात “घर घर संविधान” अशा घोषणा देत संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधानाचे पूजन करण्यात आले.संविधान माहितीपर भित्तीपत्रक प्रदर्शन, शिक्षक व विद्यार्थी भाषणे या कार्यक्रमांचा समावेश होता. त्यानंतर २६/११ च्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सामुदायिक संविधान म्हटले गेले.

यावेळी मुख्याध्यापक अमर भाट यांनी स्वतंत्र भारताचे संविधान निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान, संविधानाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधान पालन व रक्षणाचे आवाहन केले.विद्यार्थ्यानी संविधान दिनाविषयी अतिशय उत्तम भाषणे केली.कांबळे व्ही पी यांनी संविधानाविषयी आपल्या मनोगतातून सविस्तर माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व्ही विद्यार्थी उपस्थित होते.
अमित राऊत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तसेच प्रीतम विचारे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here