आमदार किरण (भैय्या) सामंत यांचा डोंगर ग्रामस्थांना दिलासा; स्वखर्चातून केला अर्जुना खाडीपर्यंत गाळ उपसा
डोंगर ग्रामस्थांकडून आमदार किरण (भैय्या) सामंत यांचे जाहीर आभार!
*राजापूर, * : राजापूर तालुक्यातील डोंगर येथील डोंगरादेवी मंदिर ते डोंगर ब्रिज ते अर्जुना खाडीपर्यंत साचलेल्या गाळाचा उपसा करण्याचे महत्त्वपूर्ण काम राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी स्वखर्चाने करून दिले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या आणि लोकहिताच्या कार्याबद्दल डोंगर येथील ग्रामस्थांनी त्यांचे जाहीर आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
डोंगर परिसरातील डोंगरादेवी मंदिरापासून डोंगर ब्रिजमार्गे अर्जुना खाडीपर्यंतच्या भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने स्थानिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, या कामासाठी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता त्यांनी स्वखर्चाने गाळ उपसा करण्याचे काम करून दिले.
लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आमदार किरण (भैय्या) सामंत यांची ओळख निर्माण झाली आहे. डोंगर येथील गाळ उपशाचे काम हे त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.
स्थानिक गावांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेणे, आवश्यक त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालणे आणि जनतेच्या हितासाठी आर्थिक योगदान देणे, या त्यांच्या भूमिकेचे डोंगर ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
या कामामुळे डोंगर परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जनतेच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारे आणि विकासकामांसाठी सदैव तत्पर असणारे आमदार किरण (भैय्या) सामंत यांचे डोंगर ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले आहेत.
