Home रत्नागिरी इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर इंडिया -पुणे यांनी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी दोन दिवसांची ज्येष्ठ नागरिक मोबाईल प्रशिक्षण कार्यशाळा संघाच्या सभागृहात आयोजित केली होती.

इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर इंडिया -पुणे यांनी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी दोन दिवसांची ज्येष्ठ नागरिक मोबाईल प्रशिक्षण कार्यशाळा संघाच्या सभागृहात आयोजित केली होती.

0
इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर इंडिया -पुणे यांनी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी दोन दिवसांची ज्येष्ठ नागरिक मोबाईल प्रशिक्षण कार्यशाळा संघाच्या सभागृहात आयोजित केली होती.

इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर इंडिया -पुणे यांनी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी दोन दिवसांची ज्येष्ठ नागरिक मोबाईल प्रशिक्षण कार्यशाळा संघाच्या सभागृहात आयोजित केली होती. संस्थेतर्फे सर्वश्री सुशांत सोनवणे, नंदकुमार सकट आणि विलास शिंदे यांनी कार्यशाळेतील सहभागी ज्येष्ठाना स्मार्ट फोन कसा वापरायचा, कोणते ऍप्स वापरायचे नाहीत, कोणते ऍप्स धोकादायक आहेत या विषयी समग्र बोधप्रद माहिती प्रात्यक्षिकासह दिली. कडक उन्हाळा असूनही 35 ज्येष्ठ नागरिक या प्रशिक्षणाला उपस्थित होते. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित ज्येष्ठानी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघांचे आभार मानले.
संघातर्फे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांनी इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर ऑफ इंडिया, पुणे या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ रघुनाथराव माशेलकर, कार्याध्यक्ष श्री जयंत उमरiणीकर कार्यकारी संचालिका श्रीमती अंजली राजे यांचे आभार मानले आणि त्यांना संघातर्फे छोटीशी भेट वस्तू श्री सोनावणे यांच्या कडे दिली.
ही संस्था ज्येष्टांसाठी विविध उपक्रम राबविते. अश्या अन्य उपक्रमात रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ नेहमीच सहभागी होईल असे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here