उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची जेएनयू विद्यापीठाला भेट

0
187

जेएनयू विद्याविद्यापीठाला भेट देणारे महाराष्ट्रातील पहिले मंत्री

दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांनी आज दिल्ली येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ला भेट दिली. महाराष्ट्रातून JNU विद्यापीठाला भेट देणारे ते पहिले मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यादरम्यान, कुलगुरू प्रा. संतश्री पंडित यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक बदलांसंदर्भात सखोल संवाद साधण्यात आला. उच्च शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा घडून आली.

या विशेष प्रसंगी संजय नाहर यांसह JNU विद्यापीठातील अनेक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र व JNU यांच्यात अधिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here