रत्नागिरीकराटेच्या जागतिक स्पर्धेत अष्टमीच्या दोन भगिनींची कांस्यपदकांना गवसणी

कराटेच्या जागतिक स्पर्धेत अष्टमीच्या दोन भगिनींची कांस्यपदकांना गवसणी

कराटेच्या जागतिक स्पर्धेत अष्टमीच्या दोन भगिनींची कांस्यपदकांना गवसणी–

फातिमा आणि साराच्या यशाने रोहा-अष्टमीचा गौरव; मन्सूर नाडकर कुटुंबाचे अभिनंदन

👉अष्टमी (रोहा) : पुणे येथे आयोजित ८व्या WGKF जागतिक गोजू रियू कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये अष्टमी, रोहा येथील फातिमा मन्सूर नाडकर आणि सारा मन्सूर नाडकर या सख्ख्या भगिनींनी कांस्यपदके पटकावून रोहा-अष्टमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

फातिमा मन्सूर नाडकर हिने १८ ते २० वर्षे वयोगटात, तर सारा मन्सूर नाडकर हिने १६ ते १७ वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. दोन्ही भगिनींच्या या यशामुळे त्यांचे कुटुंबीय, अष्टमी परिसर आणि रोहा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

फातिमा ही एम. बी. मोरे कॉलेजमध्ये इयत्ता १३वी वाणिज्य शाखेत, तर सारा ही रेवा स्कूलमध्ये इयत्ता ११वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे प्रतीक आहे.

या यशाबद्दल दोन्ही भगिनींचे, त्यांचे वडील मन्सूर नाडकर आणि प्रशिक्षक निलेश मनोहर सर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Breaking News

De Beste Deposit Methods bij het Cashobet Casino

Voor spelers die ooit zijn op zoek naar een...

Game Selection Strategies at conquestador Casino

Choosing the right slots at conquestador casino is more...