रत्नागिरीकोंडगाव पाणी योजना चौकशीच्या फेऱ्यात?

कोंडगाव पाणी योजना चौकशीच्या फेऱ्यात?

कोंडगाव पाणी योजना चौकशीच्या फेऱ्यात?

शासकीय अहवालआणि पुराव्यांनिशी ग्रामसभेत माहिती अधिकार कार्यकर्ता निलेश सावंत यांची माहिती

कोंडगाव येथे जलजीवन मिशन योजनेत कागदावर दाखवल्याप्रमाणे ८१ नळ कनेक्शन्स अस्तित्वातच नसून मोठ्या प्रमाणात जल जीवन कामाची विसंगती आहे” अशी कबुली दिल्याची माहिती समोर ग्रामसभेत काम स्थगितीचा ठराव मंजूर, मात्र ठरावाची प्रत देण्यास ग्रामपंचायतीची टाळाटाळ
जलजीवन मिशन अंतर्गत मौजे कोंडगाव बाईंगवाडी येथील ३८ लाख २२ हजार २७६ रुपयांच्या सुधारात्मक नळपाणी पुरवठा योजनेत प्रत्यक्ष काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला निधी वर्ग केल्याचा प्रकार आज (२८ मे २०२६) सध्याच्या सरपंच धनश्री राजेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धगधगत्या ग्रामसभेत पुराव्यांसह उघडकीस आला आहे हा संपूर्ण प्रकार ‘माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ’ चे संगमेश्वर तालुका सक्रिय सदस्य श्री. निलेश अशोक सावंत यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून थेट ग्रामपंचायत आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त केलेल्या अधिकृत शासकीय अहवाल आणि कागदपत्रांच्या आधारे मांडला आहे.
सावंत यांनी मिळवलेल्या अधिकृत अहवालानुसार – रस्ता दुरुस्ती, नवीन विहिरीची वीज जोडणी आणि पाईपलाईनच्या खर्चाचा कोणताही तांत्रिक तपशील संबंधित कार्यालयाकडे उपलब्ध नाही. या माहितीला स्वतः ग्रुप ग्रामपंचायत कोंडगावचे प्रभारी ग्रामसेवक श्री. प्रवीण माईन यांच्या स्वाक्षरीने दिनांक ०६ मे २०२६ रोजी श्री. निलेश अशोक सावंत यांना दिलेल्या अधिकृत पत्राने दुजोरा मिळाला असून, त्यात “सदर जलजीवन मिशन योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसल्यामुळे पाणीपट्टी वसुली केलेली नाही” अशी स्पष्ट लेखी कबुली देण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, पाणी पुरवठा विभागाच्या कागदपत्रांमधील परिशिष्ट २ व ३ वर माजी सरपंच सौ. प्रियांका प्रवीण जोशी आणि माजी ग्रामसेवक श्री. एल. एस. पवार यांच्या स्वाक्षरीने गावात ८१ नळ जोडण्या पूर्ण झाल्याचे दाखवून २७ जानेवारी २०२४ रोजी गावाला कागदोपत्री १००% नळजोडणी आणि रस्ते दुरुस्ती झाल्याचे खोटे “हर घर जल” प्रमाणपत्र उप अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, संगमेश्वर) यांनी बहाल केले होते जलजीवन मिशन योजना अद्याप अपूर्ण असताना आणि ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसताना हे प्रमाणपत्र कसे दिले गेले, याबाबत आजच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, या गंभीर विषयावर उत्तर देण्यासाठी आजच्या ग्रामसभेत माजी सरपंच सौ. प्रियांका प्रवीण जोशी, माजी ग्रामसेवक श्री. एल. एस. पवार आणि कंत्राटदार श्री. मानस जागुष्टे हे तिघेही उपस्थित नव्हते. मात्र, सध्याच्या सरपंच धनश्री राजेंद्र जोशी यांनी यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर केलेल्या पाहणीत “त्या ठिकाणी कागदावर दाखवल्याप्रमाणे ८१ नळ कनेक्शन्स अस्तित्वातच नसून मोठ्या प्रमाणात विसंगती आहे” अशी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
या अधिकृत ऑन-रेकॉर्ड पुराव्यावरून आणि तिघांच्या अनुपस्थितीवरून गावकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले की—जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार,भाप्रसे यांच्या अधिकृत प्रशासकीय मान्यता पत्रातील अट क्रमांक १४ नुसार अटींचा भंग झाल्यास काम रद्द करून तांत्रिक व लेखापरीक्षणाची संपूर्ण जिम्मेदारी उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याची राहील असे स्पष्ट नमूद होते. तरीही प्रत्यक्ष जागेवर नळ जोडण्याच अस्तित्वात नसताना, रस्ते उखडलेले व जलजीवन मिशन योजना अपूर्ण ठेवून शासकीय निधी कशाच्या आधारे वर्ग केला गेला? गावकऱ्यांनी अधिकृत शासकीय अहवालांनिशी संबंधित जबाबदार अधिकारी व कंत्राटदार आणि काम अपुूर्ण असताना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेले माजी सरपंच यांची अभियंत्यांकडे विचारणा करून या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Breaking News

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही-- 👉 ‘राष्ट्रीय...

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस आक्रमक

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस आक्रमक-.. 👉मागील...