कोकणकोकणचे सुपुत्र नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा करण्यात आला सन्मान.

कोकणचे सुपुत्र नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा करण्यात आला सन्मान.

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष,
कोकणचे सुपुत्र, आमदार तथा माजी मंत्री श्री.
रवींद्र चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश
भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात विशेष भेट
घेऊन सन्मान करण्यात आला.
आमदार रवींद्र चव्हाण साहेबांनी प्रदेशाध्यक्षपदाची
सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच रत्नागिरी नगरपालिकेचे
माजी नगरसेवक यांनी त्यांची भेट घेऊन सन्मानचिन्ह
प्रदान करून आपला अभिमान व्यक्त केला.

या विशेष भेटीत भारतीय जनता पार्टीचे महिला प्रदेश
सचिव सौ. शिल्पा ताई मराठे, जिल्हाध्यक्ष राजेश
सावंत, माजी नगरसेवक मुन्ना चंवडे, उमेश
कुळकर्णी, राजू तोडणकर, जिल्हा नियोजन समिती
सदस्य सचिन करमकर, राजू भाटलेकर, राजन
फाळके व मंदार खंडकर आदी उपस्थित होते.
रत्नागिरीतील सुपुत्राचा पुढाकार
या सन्मान भेटीचे विशेष श्रेय रत्नागिरीचे सुपुत्र
अनिकेत पटवर्धन यांना जाते. त्यांच्या पुढाकारामुळेच
हा सन्मान सोहळा यशस्वीपणे पार पडला.

या भेटीत चव्हाण साहेबांनी पक्ष संघटन अधिक
मजबूत करण्यावर भर देण्याचे आणि कार्यकर्त्यांच्या
समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वस्थ केले.

या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये नवचेतना
निर्माण झाली असून आगामी काळात कोकणातील
भाजप संघटन अधिक भक्कम होईल, असा विश्वास
व्यक्त करण्यात आला.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा...

Где найти реальные анкеты в Москве: карта проверенных ресурсов

Рынок интимных услуг в Москве — это не стихийный...