रत्नागिरीखासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५...

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास–

👉रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यास उत्साहात सुरुवात केली आहे.

या औचित्याने आज सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी खा. राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार श्री. निलेश राणे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत श्री देव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विडे यांची आकर्षक आरास मांडून श्रद्धापूर्वक अर्पण केली.
या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे आणि राणे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे यांचा समावेश होता.
खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही दिवस विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...