छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार आणि सरदार यांच्या वंशजांसोबत रत्नदुर्ग किल्ल्याची पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी केली पाहणी–
👉छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्यनिष्ठ सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज श्री इंद्रजित जेधे, सरदार कृष्णाजी बांदल यांचे वंशज श्री अनिकेत बांदल, सरनोबत येसाजी कंक यांचे वंशज श्री रवींद्र कंक, सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज श्री श्रीनिवास इंदलकर, सरदार पिलाजी सणस यांचे वंशज श्री बाळासाहेब सणस यांच्यासोबत पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी रत्नागिरी मध्ये संवाद साधला. यानंतर रत्नागिरी इथल्या ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याची पाहणी देखील या वंशजांसोबत केली.
तत्कालीन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर या वंशजांनी काही मागण्यांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासोबतच या मागण्या सोडविण्या साठी एका समितीची स्थापना केली होती. मात्र, त्या प्रस्तावित मागण्या सोडविण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याशिवाय या वंशजांनी दिलेल्या इतर सूचनांचाही सकारात्मक विचार करुन त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी सांगितले आहे
