Home रत्नागिरी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी एजाज इब्जी यांचे लाक्षणिक उपोषण.उपोषण न करण्या बाबत प्रशासनाची विनंती, मात्र एजाज इब्जी उपोषणावर ठाम

जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी एजाज इब्जी यांचे लाक्षणिक उपोषण.उपोषण न करण्या बाबत प्रशासनाची विनंती, मात्र एजाज इब्जी उपोषणावर ठाम

0
जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी एजाज इब्जी यांचे लाक्षणिक उपोषण.उपोषण न करण्या बाबत प्रशासनाची विनंती, मात्र एजाज इब्जी उपोषणावर ठाम

जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी एजाज इब्जी यांचे लाक्षणिक उपोषण.
उपोषण न करण्या बाबत प्रशासनाची विनंती, मात्र एजाज इब्जी उपोषणावर ठाम
रत्नागिरी – रत्नागिरी मजगांव येथील सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक एजाज इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपल्या वरील झालेल्या अन्याया विरोधात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालया बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जाहीर केले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की एजाज इब्जी यांचे भाऊ शरीफहसन इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. अर्जात काही त्रुटी किंवा योग्य माहिती नसल्याने अर्ज निकाली काढला. मात्र जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने एजाज इब्जी यांच्या वर चुकीचे आरोप लावून अर्ज निकाली काढला. जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने शरीफहसन इब्जी यांना दिलेल्या नोटीसात असे उल्लेख केले की उर्दू शाळेत जात लिहिण्याची पद्धत नव्हती. एजाज इब्जी हे शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या मुलांच्या शालेय रेकॉर्ड मध्ये जात घुसडली. एजाज इब्जी यांची मुलगी आयशा एजाज इब्जी हिला सुमारे पंधरा वर्षा पूर्वी वैध जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेला दाखला ही खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला.
एजाज इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाकडे तक्रार करुन या बाबत विचारणा केली. माहिती अधिकारात माहिती मागविली. योग्य माहिती न मिळाल्याने अपिलात ही गेले. मात्र त्यांच्या कडे अशी कोणतीही माहिती नसल्याने जातपडताळणी समिती ने एजाज इब्जी यांच्या वर चुकीचे आरोप केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने तर न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्या बाबत निर्देश दिले आहेत.
सामान्य व्यक्तीची कोणतीही चुक नसताना आणि कार्यालयाच्या बेबंदशाही मुळे अन्यायग्रस्त व्यक्तीने न्यायालयात का म्हणून जावे ? यांच्या कारभाराला कंटाळून एजाज इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या कार्यालया बाहेर २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी रत्नागिरी , पोलिस अधीक्षक रत्नागिरी , पोलिस निरीक्षक रत्नागिरी, तहसीलदार रत्नागिरी , प्रांताधिकारी रत्नागिरी तसेच जातपडताळणी कार्यालयाला कळविले आहे.
प्रशासनाने एजाज महमूद इब्जी यांना उपोषण न करण्या बाबत विनंती केली आहे. मात्र ठोस लेखी निर्णय न मिळाल्याने एजाज इब्जी हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here