रत्नागिरीजिल्हास्तरावर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे मंगळवारी उद्घाटन

जिल्हास्तरावर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे मंगळवारी उद्घाटन

रत्नागिरी, (जिमाका) : बालकांसाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी शिवाजी महाराज स्टेडीयम येथे सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी कळविले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागातील शासकीय / स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी, मुलांमधील सूप्तगुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधूभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यास येते. या जिल्हास्तरीय बाल महोत्सवामध्ये जिल्हयातील एकूण ८ अशासकीय बालगृहातील बालके तसेच तसेच रत्नागिरी नगरपालिका शाळेमधील बालके असे एकूण ५०० बालके सहभागी होणार आहेत.
जिल्हास्तरीय बालमहोत्सवामध्ये क्रिकेट, खोखो, कबड्डी, गोळा फेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १०० मीटर रिले, कॅरम, बुध्दीबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रिडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामुहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन इ. सांस्कृतीक स्पर्धांचे आयोजन दि. ६ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर जवळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

Breaking News

Instant Casino: Slot RTP-guide

Det er let at blive overvældet af de utallige...

RTP és Kereskedelmi Stratégiák a Malina Casino Slotoknál

Az online szerencsejáték világában a Malina magyar kaszinó kínálja...