चिपळूणजिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वर घागची रौप्यपदकावर दमदार मोहोर

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वर घागची रौप्यपदकावर दमदार मोहोर

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वर घागची रौप्यपदकावर दमदार मोहोर
, चिपळूण : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे येथील विद्यार्थी स्वर घाग याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आपल्या यशाची चमक दाखवली.

तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर स्वरने जिल्हास्तरावरही आपल्या खेळातील कौशल्य आणि चिकाटीचे दर्शन घडविले. प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत त्याने रौप्यपदकावर आपले नाव कोरले आणि शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
स्वरच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत यशाची झेप… आता लक्ष्य राज्यस्तराचे!” असा आत्मविश्वास स्वरच्या या कामगिरीतून दिसून येत आहे. भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही त्याने चमकदार कामगिरी करावी, यासाठी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष चिपळूण विधानसभे चे आमदार शेखर निकम सचिव महेश महाडिक व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीरा जोशी स्वरचे अभिनंदन केले आहे
फोटो
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डेच्या
मुख्याध्यापिका सौ मीरा जोशी स्वरचे अभिनंदन करताना

Breaking News

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'आधार प्रमाणीकरणासाठी पात्र...