जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न

0
4

जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न-
👉🏻रत्नागिरी जिल्ह्यातील २३० खेळाडूंचा सहभाग; विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या अंतर्गत कराटे असोसिएशन रत्नागिरी, तालुका व जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाली.


सदर स्पर्धा बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई प्रशांत सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. मेघा कुलकर्णी उपस्थित होत्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, क्रीडा अधिकारी श्री. गणेश जगताप, कराटे असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. जावेद मिरकर, सचिव श्री. सुरज बने, उपाध्यक्ष श्री. दीपक कदम, खजिनदार श्री.अरुण बेग सदस्य सौ. नौशीन कापडी, गुहागर तालुका प्रशिक्षिका डॉ. योगिता खाडे, श्री. हुजेफा ठाकूर, लांजा तालुका प्रशिक्षक श्री. मंगेश हटकर, दापोली तालुका प्रशिक्षक श्री. सुरेंद्र शिंदे, ॲड. प्रकाश जाधव तसेच विविध तालुक्यांतील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक उपस्थित होते.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध वयोगटांमध्ये वजनगटनिहाय सामने घेण्यात आले. रत्नागिरी, खेड, चिपळूण, देवरुख, लांजा, राजापूर, साखरपा, गुहागर व दापोली या तालुक्यांतील सुमारे २३० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
प्रत्येक वजनगटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या खेळाडूंसह चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूंनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजयी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
१४ वर्षांखालील मुले
२५ ते ३० किलो : प्रथम अब्दुल मुब्दी धामस्कर, द्वितीय समर्थ विनीत गोताड, तृतीय अरहान जोहेब सोलकर व स्वयम् गणेश पवार.
३० ते ३५ किलो : प्रथम स्वर संजय सुर्वे, द्वितीय चैतन्य व बांबडे, तृतीय अमीर युसुफ खान व अवधूत आंबेकर.
३५ ते ४० किलो : प्रथम इब्राहिम गावकडकर, द्वितीय मोहम्मद फणसोपकर, तृतीय आयान शेख व आर्य कुमार मर्चंट.
४० ते ४५ किलो : प्रथम ओम शिर्के, द्वितीय रेहान मजगावकर, तृतीय हसनेन मुजावर व अंकुर कदम.
४५ ते ५० किलो : प्रथम अथर्व कदम, द्वितीय अरहान मुकादम, तृतीय श्लोक भिंगार्डे व हुसेन डंबीर.
५० ते ५५ किलो : प्रथम वेदांत देवाडिगा, द्वितीय मयुरेश रजपूत, तृतीय काझीम शहा.
५५ ते ६० किलो : प्रथम अर्णव जोगळेकर, द्वितीय अणस मेढवली.
६० किलोवरील : प्रथम विघ्नेश नलावडे, द्वितीय साईश शिरधनकार, तृतीय फराज बंदरकर व अद्वैत ढवळ.
१४ वर्षांखालील मुली
२६ ते ३० किलो : प्रथम प्रियवंदा बोरवणकर, द्वितीय मीहिका गोताड, तृतीय सई पाटील.
३० ते ४० किलो : प्रथम रुंजी सुर्वे, द्वितीय ईश्वरी सावंत, तृतीय हया काझी व शुभ्रा माबदी.
३४ ते ३८ किलो : प्रथम आराध्य कोकाटे, द्वितीय जोया बुडिये, तृतीय रिद्धी वळवी व सोना जाधव.
३८ ते ४२ किलो : प्रथम दुर्वा चव्हाण, द्वितीय तनया शितल, तृतीय लावण्या नलावडे.
४२ ते ४६ किलो : प्रथम आयशा मुल्ला, द्वितीय दिशा चौधरी, तृतीय अनुष्का झोरे व अहलाम काझी.
४६ ते ५० किलो : प्रथम अमीना पाटणकर, द्वितीय किमया शिरधनकर, तृतीय विहा पावसकर.
५० किलोवरील : प्रथम शुभ्रा कडवेकर, द्वितीय समायरा काझी, तृतीय स्वरा चव्हाण व जैनब बोरकर.
१७ वर्षांखालील मुले
३५ किलोखालील : प्रथम दुर्वांक बंडे.
३५ ते ४० किलो : प्रथम स्पर्श लिंगायत, द्वितीय अर्णव जोशी, तृतीय सुजल साळवी व ताहीब माहीमकर.
४० ते ४५ किलो : प्रथम स्पंदन लिंगायत, द्वितीय प्रशांत शेंडे, तृतीय हमजा देवळेकर व शौर्य पवार.
४५ ते ५० किलो : प्रथम अथर्व मोरे, द्वितीय जावेद कोरबू, तृतीय ओम शेटे व सफल कलगड.
५० ते ५४ किलो : प्रथम रुद्र खर्डे, द्वितीय रोमित घोसाळकर, तृतीय वेदांत सागवेकर व हर्ष शेलार.
५४ ते ५८ किलो : प्रथम ध्रुव बसणकर, द्वितीय रोहन चौधरी, तृतीय लीलाधर साठपे व आदित्य नारकर.
५८ ते ६२ किलो : प्रथम ताहीर मंगा, द्वितीय मानस पाठवणे, तृतीय दुर्वांक राऊत व राजकुमार मिस्त्री.
६२ ते ६६ किलो : प्रथम अर्णव भाटकर.
६६ ते ७० किलो : प्रथम मोहम्मद अली बरमारे, द्वितीय संग्राम तांबे.
७० ते ७४ किलो : प्रथम अनिकेत गोडे, द्वितीय ऊजर मस्तान.
१७ वर्षांखालील मुली
३२ ते ३६ किलो : प्रथम गार्गी केळकर.
३६ ते ४० किलो : प्रथम करुणा जाधव, द्वितीय मनाली घाडीगावकर, तृतीय पूजा बागवे व तीर्थ माध्ये.
४० ते ४४ किलो : प्रथम आयशा मस्तान, द्वितीय हेमांगी मेंढे, तृतीय उत्कर्ष पाटील व पूर्वी शिंदे.
४४ ते ४८ किलो : प्रथम प्राची सकपाळ, द्वितीय अनुष्का मुसळकर.
४८ ते ५२ किलो : प्रथम तनुजा बारस्कर, द्वितीय अक्षरा माने, तृतीय आर्या पवार व अध्यासा दास.
५२ ते ५६ किलो : प्रथम आराध्या चव्हाण, द्वितीय मधुरा पारकर, तृतीय सानिका पवार व अफ्रिन काद्री.
५६ ते ६० किलो : प्रथम फातिमा बुडये, द्वितीय आर्या झोरे, तृतीय अनया चव्हाण.
६० ते ६४ किलो : प्रथम दुर्वा पवार.
६८ किलोवरील : प्रथम खुशी हटकर.
१९ वर्षांखालील मुले
५४ ते ५८ किलो : प्रथम महेश वाघमारे.
६२ ते ६८ किलो : प्रथम शुभम भंडारे, द्वितीय सम्राट महाडिक, तृतीय सार्थक हटकर.
१९ वर्षांखालील मुली
३६ ते ४० किलो : प्रथम रिया माचकर.
४४ ते ४८ किलो : प्रथम मानवी कपाले.
४८ ते ५२ किलो : प्रथम संचिता हटकर.
५२ ते ५६ किलो : प्रथम सोम्या अंजार्लेकर.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कराटे असोसिएशन रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, स्वयंसेवक व पालक यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक व पालकवर्ग यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी सर्व निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
कराटेच्या माध्यमातून शिस्त, आत्मविश्वास, साहस व क्रीडाभावना जोपासणाऱ्या या स्पर्धेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय कराटे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यास उत्तम व्यासपीठ मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here