संगमेश्वरजिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर कोंडअसुर्डे नं १ संगमेश्वर तर्फे शिवजयंती निमित्त भव्य...

जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर कोंडअसुर्डे नं १ संगमेश्वर तर्फे शिवजयंती निमित्त भव्य शिवशोभा यात्राचे आयोजन–

संगमेश्वर / सत्यवान विचारे.

संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी शिव जयंतीचे औचित्य साधतं शोभा यात्रेचे आयोजन केले होते. त्याला संगमेश्वर व्यापारी वर्गाने भरघोस प्रतिसाद दिला.

शाळेतील चालीस विध्यार्थी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.यामध्ये पालक, ग्रामस्थ, महिला वर्ग यांची लाक्षणीय उपस्थिती होती.

या प्राथमिक शाळेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन सातत्याने होत असते.

त्यातच शिवजयंती चे औचित्य साधून शिवशोभा यात्रेचे आयोजन करणेत आले होते.

संगमेश्वर बस स्थानक बाजारपेठ परिसरातून शोभा यात्रेला ढोल पथक,आणि लेझीम नृत्याने शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात
जय भवानी जय शिवाजी घोषणांनी संगमेश्वर बाजारपेठ सहित कोंड असुर्डे परिसर दुमदुमला
शाळेची प्रत्येक क्षेत्रात,वाखाणण्याजोगी प्रगती शाळेतील विद्यार्थिनी कु.शुभ्रा शेटे तालुका नासा मध्ये घवघवीत यश तर सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा खो खो संघात कु.मुद्रा रहाटे हिची चमकदार कामगीरी
भविष्यात शाळेला आय एस ओ नामांकन मिळविण्याकरिता शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ यांचं लक्ष लागले आहे.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांच्या कडून देखील शिवजयंती निमित्त विविध वेशभूषा करून शिवशोभा यात्रा काढल्या बद्दल मुलांचे विशेष कौतुक करण्यात आले

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?Churchill-systemet i Balloon ser robust...